आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमापूजन:स्व.बिंदुमाधव जोशी जयंतीदिनी नंदुरबारात अभिवादन‎

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे ‎ संस्थापक अध्यक्ष बिंदुमाधव जोशी ‎ ‎ यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबारला ‎ ‎प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात ‎आले. ‎ ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि ‎महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ ‎ नंदुरबार तालुका शाखेच्या संयुक्त ‎ ‎ विद्यमाने वाघेश्वरी नगर भागातील ‎ "मातोश्री’ निवासस्थानी ‎ प्रतिमापूजन आणि अभिवादन ‎करण्यात आले.

याप्रसंगी ग्राहक ‎ पंचायतचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश ‎ जैन यांच्या हस्ते बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात‎ आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश‎ प्रवासी महासंघाचे नंदुरबार‎ तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी ‎ बिंदुमाधव जोशी यांच्या आठवणींना ‎ उजाळा दिला. ते अनेकदा ‎ नंदुरबारला येऊन गेले. नंदुरबार ‎ जिल्ह्याविषयी त्यांना विशेष आस्था ‎ होती, असेही हिरणवाळे यांनी ‎ सांगितले. अभिवादन कार्यक्रमास ‎ तालुका अध्यक्षा अबोली चंद्रात्रे, ‎ अपेक्षा चव्हाण, योगेश्वर ‎ जळगावकर, डॉ. गणेश ढोले, बी. ‎ डी. गोसावी, संभाजी पाटील, वैभव ‎ करवंदकर, अनिल बरे, गोरखनाथ ‎ बावा, आदी उपस्थित होते. ‎

बातम्या आणखी आहेत...