आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील बाहेरपुरा परिसरातील चर्मकार समाज व संत रोहिदास व्यायामशाळे तर्फे विविध कार्यक्रम झाले. प्रतिमापूजन अन्नदानासह शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी पालिकेचे माजी बांधकाम समितीचे सभापती प्रमोद शेवाळे, माजी नगरसेवक किरण रघुवंशी, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते डॉ. विक्रांत मोरे, नेरकर, सुभाष पानपाटील, आप्पा वाघ, दगडू अजिंठे, प्रकाश परमल, जयेंद्र परमल, विनोद अहिरे, रतिलाल अहिरे, विश्व हिंदू परिषदेचे पुरुषोत्तम काळे, अजय कासार, विजय सोनवणे, गोपाल बुनकर, ऋषिकेश बारगळ, रामभाऊ सोनार, कुंदन धनवार आदी प्रमुख पाहुणे म्हणून तसेच माजी नगरसेवक परवेज खान, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मोहिते, संतोष वसईकर, आकाश अहिरे ,दीपक पेंढारकर, तुकाराम अहिरे, चतुर अहिरे, शंकर अहिरे, भगवान अहिरे, श्यामराव अहिरे आधी उपस्थित होते.
दुपारी सजवलेल्या रथावर संत रविदास महाराजांची प्रतिमेची शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. सूत्रसंचालन धनराज अहिरे यांनी केले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व नंदुरबार चर्मकार समाजाचे अध्यक्ष राकेश कंढरे, उपाध्यक्ष नंदलाल अहिरे, खजिनदार हरीश अहिरे, सचिव प्रकाश अहिरे, सहसचिव विष्णू पवार, कार्याध्यक्ष मोहन अहिरे, प्रसिद्ध प्रमुख प्रवीण अहिरे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.