आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यतिथी:संत सावता महाराज यांना रोटरी क्लब नंदनगरीतर्फे अभिवादन

नंदुरबार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील माळीवाडा परिसरात संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे प्रतिमापूजन, अभिवादन करण्यात आले.

बुधवारी येथील माळीवाडा परिसरातील माळी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिरात अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा यांनी सावता महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून प्रास्ताविकात सांगितले की, संत सावता महाराज यांनी आपल्या कर्मातून परमेश्वर मिळतो हे दाखवून दिले. सर्वांनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. विशेषत: तरुणांनी काेणतेही काम कमी न लेखता कर्म करत राहिले पाहिजे. त्यातून परमेश्वराची प्राप्त हाेते, हा संदेश महत्त्वाचा आहे.

कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव किरण दाभाडे, क्लबचे माजी अध्यक्ष मनोज गायकवाड, बडगुजर समाज उन्नतीचे मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर, माळी समाजाचे कार्यकर्ते हरीश माळी, जीवन माळी, राजेंद्र माळी, जयेश माळी, भारत माळी, दादा माळी, अशोक मामा आदी समाजबांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...