आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती उत्सव:वीर शिरोमणी महाराणा प्रतापांना विविध कार्यक्रमांतून अभिवादन; नंदुरबार शहरासह जिल्हाभरात प्रतिमा, पुतळापूजनासह रक्तदान शिबिराचे आयोजन

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोठली येथे रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराणा प्रतापसिंह यांची जयंती व जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त कोठली (ता.शहादा) येथे युवकमित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी २० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्यादेवी रावल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोकुळबाई पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसरपंच ठाणसिंग गिरासे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आसाराम माळी, पोलिस पाटील सुकदेव पाटील, राजेंद्र बाबूसिंग गिरासे होते. शहादा ब्लड बँकेच्या सहकार्याने शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे आयोजन युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, युवकमित्र परिवाराचे समन्वयक बादलसिंग गिरासे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गिरासे, सरदारसिंग गिरासे, उमेश माळी, गोकुळ माळी, राहुल राजपूत, दीपकसिंग गिरासे यांनी केले. रक्त संकलन कामी शहादा ब्लड बँकेचे डॉ.नाजीम तेली व स्टाफचे सहकार्य लाभले. आभार बादलसिंग गिरासे यांनी मानले.

शहादा येथे श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारक ठिकाणी कार्यक्रम
शहादा येथे श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाच्या ठिकाणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी दहा वाजता प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे सरकारी वकील सुवर्णसिंग गिरासे, सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव, जिल्हा परिषद सदस्या हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पटले, माजी उपनगराध्यक्ष दीपक पटेल, अनिल भामरे, माजी नगरसेवक व तैलिक समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, माजी नगरसेवक रवींद्र जमादार, जायंट्स ग्रुप अध्यक्ष सतीश जवेरी, मानक चौधरी, भूषण बाविस्कर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, डॉ. प्रेमसिंग गिरासे, निकेश राजपूत, पोलिस उपनिरीक्षक पाटील उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रवींद्र जमादार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कोमलसिंग गिरासे यांनी करून आभार मानले.

किसान सेना अन् भिलीस्थान लायन सेनेतर्फे अभिवादन
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी, शहराध्यक्ष राजू माळी, तालुकाध्यक्ष रोहिदास वळवी, भटके-विमुक्त जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष कांतिलाल जाधव, ढंढाणेचे सरपंच नितीन नागरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, भरत पाटील, भय्या राजपूत, पंकज चव्हाण, भास्कर तडवी, चंद्रसिंग गिरासे, संजीव गिरासे, कृष्णा राजपूत, शुभम गिरासे आदी उपस्थित होते. या वेळी किसान सभेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या कार्याला उजाळा दिला.

बातम्या आणखी आहेत...