आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेचे आयोजन:युवकदिनी एचआयव्हीबाबत मार्गदर्शन

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील युवारंग फाउंडेशनतर्फे युवक व युवतींमध्ये एचआयव्ही, एड्स विषयी जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवारंग फाउंडेशनतर्फे डी.आर. महाविद्यालयात एचआयव्ही मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे १२ ते २६ ऑगस्टदरम्यान युवक व युवतींमध्ये एचआयव्ही, एड्सविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आलेे. याप्रसंगी उपप्राचार्य अहिरराव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक, युवारंग फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लुळे, जिल्हा पर्यवेक्षक विश्वास सूर्यवंशी, समुपदेशक हरपाल राजपूत उपस्थित होते. यावेळी राजपूत यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही,एड‌्स कोणत्या कारणांनी होतो, त्यापासून बचाव कसा करावा व त्याबाबत असलेले गैरसमज याविषयी माहिती दिली. नितीन मंडलिक यांनीही विद्यार्थ्यांशी चर्चेच्या माध्यमातून सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जितेंद्र लुळे यांनी तर आभार नितीन कबाडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...