आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गुजरात, बिहार, राजस्थानचे माठ भागवताय तहान, शंभर, दीडशे ते 180 रुपयांपर्यंत माठाची विक्री

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उन्हामुळे माठांना वाढते मागणी

उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची शहादा शहरात मागणी वाढत आहे. कुंभार व्यावसायिकांच्या वर्षभर मेहनतीनंतर बनवण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. तर खास करून बिहार, गुजरात तसेच राजस्थानातील आखीव रेखीव माठांना अधिक मागणी होत आहे.

पूर्वी माठातून पाणी पिण्यासाठी त्यात पेला टाकून पाणी काढावे लागत होते; परंतु सध्या तोटी लावूनच माठांची विक्री केली जात असल्याने माठाचे पाणीही तोटीतूनच मिळत आहे. या तोटीच्या माठांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे चित्र आहे. माठातले थंडगार पाणी आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. मातीच्या माठांची मे अखेरपर्यंत चांगली विक्री होत असते; मात्र बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याच्या माठाची जागा मिनरल वॉटरने घेतली आहे. त्यामुळे कुंभार व्यावसायिकांवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.

शीतपेयांचे अतिसेवन शरीराला हानिकारक असते. याउलट मातीपासून बनवलेले माठ त्यातील थंडपाणी या कालखंडात पिण्यासाठी शुद्ध आणि उपायकारक मानले जाते. या अनुषंगाने माफक किमतीत सर्वांना परवडणारे मातीचे माठ सर्व स्तरातील नागरिक खरेदी करतात. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी माठातले शीतल जल यावेळी अमृता समान भासते.

परप्रांतातून माठ विक्रेते दाखल
माठांच्या आकारानुसार शंभर, दीडशे ते १८० रुपयांपर्यंत माठ विकले जात आहेत. या माठांना गावात तसेच काही प्रमाणात शहरातही मागणी आहे. तसेच रंगीबेरंगी आकाराच्या माठांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. या उन्हात गार पाणी तरी मिळावे याकरिता मातीच्या माठांना मागणी वाढली आहे. शहादा शहरात तसेच ग्रामीण भागात परप्रातांतून माठ विक्रेते दाखल झाले आहेत.

यंदा १० ते पंधरा टक्के माठाच्या किमतीत वाढ
८० रुपयांपासून २००,३००,३५० रुपयांपर्यंत माठाची किंमत आहे. दिवसाला असे १० ते १२ माठ विक्रेते सहज विकले जातात. स्थानिक पातळीवरचे कुंभारही हा व्यवसाय करतात. यावर्षी किमतीत १० ते १५ टक्के वाढ अपेक्षित आहे. सोनू कुभांर, माठ विक्रेता

बातम्या आणखी आहेत...