आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:खापरनजीक १२ लाखांचा गुटखा ; वाहनही केले जप्त

नंदुरबार/अक्कलकुवाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर खापर नजीक एका वाहनाच्या तपासणीत १२ लाख ११ हजार रुपये किमतीचे ९ हजार ७५० गुटख्याचे पॅकेट आढळले असून त्या सह १३ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. अक्कलकुवा पोलिस व येथील अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी गुप्त माहिती मिळताच औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच अक्लकुव्याच्या पोलिसांनी पाळत ठेवून अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावर एका हॉटेलजवळ वाहन पकडले. टाटा कंपनीचे असलेल्या एमएच ४० एन २७२७ या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूचे ९ हजार ७५० पॅकेट्स आढळले. त्याची बाजारपेठेत किंमत १२ लाख ११ हजार रूपये आहे. तसेच १३ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. असा एकूण २५ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजकुमार रामकरण यादव (वय ४२) रा.वाडी, नागपूर यांस अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आ.भा. पवार यांनी फिर्याद दिली असून अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. ही कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ए.एस. आगरकर, पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत, कपिल बोरसे, देविदास विसपुते, किशोर वळवी, खुशाल माळी, अजय पवार, आदिनाथ गोसावी, गिरीश सांगळे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त सं.कृ. कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी पवार व लिपिक समाधान बारी यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...