आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:चारित्र्याचा संशय घेत महिलेचा छळ

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्यावर संशय घेत विवाहित महिलेकडून सासरच्या लोकांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. पाच लाखांची रक्कम न दिल्याने विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याने अक्कलकुवा पोलिस ठाण्यात पतीसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील अश्विनी महेश मोहिते यांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार महेश मोहन मोहिते, मोहन धर्म मोहिते, सुरेखा मोहन मोहिते व माधुरी कडू या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलिस उपनिरीक्षक अंकिता बाविस्कर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...