आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापन्नास लाखांसाठी पत्नीचा छळ करणाऱ्या पतीला न्यायाधीश चव्हाण यांनी १ वर्ष कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपयांचा दंडाची शिक्षा देखील ठोठावली.नंदुरबार येथील नागसरनगर येथे राहणाऱ्या विमल बाबुलाल राठोड या २६ वर्षीय महिलेचा अजनाडा बंगाला (ता. शिरपूर) येथील सॉफ्टवेयर इंजिनिअर असलेले बाबुलाल दरबार राठोड यांच्याशी लग्न झाले होते. मात्र पत्नी विमलबाईवर चारित्र्याचा संशय घेऊन शारिरिक व मानसिक छळ करून जिवेठार मारण्याची धमकी देत होते. तसेच प्लॅट घेण्यासाठी माहेरून पन्नास लाखची मागणी करू लागले. या मानसिक व शारिरीक जाचास कंटाळून विमल राठोड यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली.
बाबुलाल राठोड व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरूध्द गुन्हा करण्यात आला होता. नंदुरबार तालुका पोलिस हवालदार साहेबराव चौरे यांनी शास्त्रोक्त पध्दतीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले. दोषारोपपत्र न्यायदंडाधिकारी विनोद चव्हाण यांच्या न्यायालयात सादर केले. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी या सर्व बाबींचा विचार करून राठोड यांस एक वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार साहेबराव चौधरी यांनी केला असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. सुनिल पाडवी यांनी पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार पंकज बिरारे यांनी कामकाज पाहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.