आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार जिल्ह्यात मंगळवारी यंदाच्या हंगामातील सर्वोच्च ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यामुळे उन्हाच्या झळांनी नागरिक पोळून निघाले. तर मंगळवारी रोजी असलेल्या आठवडे बाजारावरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आहे. उष्णतेच्या लाटांपासून काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे
नंदुरबारात गेल्या १५ ते २० दिवसापासून तापमानाने चाळिशी पार केलेली होती. त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होऊन सर्वोच्च ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. नंतरच्या कालावधीत तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले. तर मंगळवारी सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचे मोठ्या प्रमाणावर चटके जाणवू लागले आहे.
वृक्षतोडीचा तापमान वाढीवर परिणाम
सगळीकडेच वृक्षतोड होत आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्णतेत वाढ होत आहे. राजस्थानमधून उष्ण वारे वाहत आहेत. भविष्यातही उष्णतेची लाट अशीच असेल. मान्सूनमध्ये कमी दिवसांत अधिक पाऊस पडणार आहे. हा सर्व भौगोलिक बदलांचा परिणाम झाला आहे. -सचिन फड, हवामान तज्ज्ञ, कोलदा कृषी विज्ञान केंद्र
अशी घ्यावी आरोग्याची काळजी
आरोग्याच्या दृष्टीने डोळयांना गॉगल लावावा. पांढरे कपडे परिधान करावे. सकाळी व सायंकाळी बाहेर पडावे. उन्हात शक्यतो बाहेर पडू नये. नंदुरबार शहरात उष्णतेची लाट आली असली तरी उष्णतेसोबतच दिवसभर वेगात वारा वाहत होता. त्यामुळे उष्णतेच्या झळा काही प्रमाणात होत्या.
पाच दिवस हवामान राहील कोरडे
भारतीय हवामान विभाग मुंबईच्या प्राप्त हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस हवामान काेरडे राहील. त्यामुळे कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सीअसपर्यंत राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.
हवामान दृष्टीने संवेदनशील जिल्हा
यंदा देशभरात १.५ अंश सेल्सीअस तापमानात वाढ झाली आहे. त्यात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने यांच्याकडून आलेल्या अहवालानुसार बुलडाणा आणि नंदुरबार हे दोन्ही जिल्हे यंदा हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील जिल्हे म्हणून नोंद करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.