आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:नंदुरबारला अर्धातास जोरदार पाऊस; पाणी साचून बाजारात विक्रेत्यांचे हाल

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. तीस ते चाळीस मिनिटे पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या चार दिवसापासून दररोज ढगाळ वातावरण आणि सुर्य दर्शन असे दोन्ही अनुभव नंदुरबारकरांना अनुभवयास मिळत आहेत. कालही हलकासा पाऊस पडला. आज शुक्रवारी जोरदार हाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती दिली.

सायंकाळी पावसाने विश्रांती दिलेली असताना रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली.विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाली.जुनी भोई गली,श्री राम मंदिर,कुंभार गल्ली,गवळी वाडा याभागात पाणी वाहू लागले. गिरिविहार, विद्या विहार या कॉलनी परिसरामध्ये पाणी तुंबले. उड्डाण पूल खाली मिरची पथारीत वाळायला घातलेल्या मिरचीचे नुकसान झाले. पावसामुळे मिरची काळी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. परतीचा पाऊस नुकसान दायक ठरेल,अशी भीती आहे.

बातम्या आणखी आहेत...