आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्याला ताप:वीजचोरी जास्त, वसुली कमी त्या भागामध्ये अचानक भारनियमन, उन्हामुळे विजेची मागणी अधिक वाढल्याचा परिणाम

नंदुरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोळशाचा तुटवडा असल्याने वीज निर्मिती कमी व उन्हामुळे विजेची मागणी अधिक असल्याने जिल्ह्यात भारनियमन सुरु झाले आहे. भारनियमनाची वेळ निश्चित नाही. वरिष्ठ पातळीवरुन आदेश आल्यानंतर अचानक भारनियमन केले जात आहे. शहरात कमी तर ग्रामीण भागात जास्त आहे. ज्या भागात वीज चोरी, गळती व थकबाकी अधिक आहे, त्या भागात भारनियमनाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, शुक्रवारी नंदुरबार शहरात भारनियमन केले नाही, असा दावा कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. विजेचे भारनियमन हा नियोजनाचा भाग नसून गरज पडली तरच भारनियमन होईल, असेही ते म्हणाले. ग्रामीण भागात आष्टा, पळाशी, विसरवाडी, खांडबारा या फीडरवर विजेची थकीत जास्त आहे. त्यामुळे भारनियमन क्रमप्राप्त आहे.

भारनियमनाचे वेळापत्रक नाही

भारनियमनाचे वेळापत्रक नाही. विजेच्या उपलब्धतेवर भारनियमन केले जाणार आहे. ज्या वेळेत अधिक विजेचा वापर होतो, अशा वेळेत भारनियमन केले जाणार आहे. जसे सकाळी पाणी गरम करण्यासाठी हीटरचा वापर होतो. तर दुपारी एसी, कुलरचा वापर अधिक होतो. तर रात्रीही प्राईम टाईमला भारनियमन करून विजेची बचत केली जाणार आहे. परंतु हा त्रास ठरावीक फीडरच्या ग्राहकांना सहन करावा लागेल. सताड उघडी असलेली फ्यूज पेटी.