आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:हॉटेलमध्ये चाकूहल्ला; बाटली फेकून मारली, दोघे गंभीर जखमी

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारूची बाटली स्वस्त दरात न दिल्याने हॉटेल सायनी या हॉटेलचालकासह दोघांना मारहाण करण्यात आली. ही घटना १३ डिसेंबरच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कल्याणी पार्कमध्ये राहणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एकावर चाकूने हल्ल्या केला तर दुसऱ्याने दारूची बाटली मारून फेकली नळवारोडवर असलेल्या हॉटेल सायनीमध्ये विजय भगवान चौधरी हा आला.

तो १४० रुपयांची दारू १०० रुपयाला मागू लागला. दारू देण्यास नकार दिल्याने त्याने हॉटेलमालकाला शिवीगाळ केली. तसेच घरी फोन लावून तिघांना बोलावून घेतले. विजयने दारूची बाटली फेकून मारली. यात कमलेश रमणलाल जयस्वालच्या कानाला लागली. तर कुणाल भगवान चौधरी याने कमलेशचा चुलत भाऊ नरेंद्र जायस्वाल याच्या छातीवर व डाव्या बाजूस वार केला.

यात नरेंद्र जायस्वाल गंभीर जखमी झाला. तसेच भगवान चौधरी व योगिता चौधरी यांनी शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विजय भगवान चौधरी यांनीही विरोधात तक्रार दिली असून कमलेश रमणलाल जायस्वाल व विशाल रमणलाल जायस्वाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...