आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:खासदार रावसाहेब दानवेंना पराभूत केल्याशिवाय टोपी काढणार नाही: शिवसेना आमदार अब्दुल सत्तार

नंदुरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवाने खोटे बोलवणाऱ्यांना वर बोलावून घेतले तर भाजपत एकही नेता जिवंत राहणार नाही : सत्तार

खासदार रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावरील टोपी काढणार नाही. भाजपला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी ग्रामपंचायतीपासून सर्व सहकारी संस्थांमध्ये शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न होतील. मंत्रिपदाचा उपयोग तळागाळातील नागरिकांना न्याय देण्यासाठी केला जाईल. डोक्यात गुर्मी आणि अंगावर चरबी वाढली तर मतदार अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवतात, असे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

नंदुरबारच्या श्रीराम मंदिराच्या रघुवंशी समाज मंगल कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा बुधवारी मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. सत्तार म्हणाले, ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर २१ वर्षांत मंत्रिपदापर्यंत पोहोचलो आहे. शिवसेनेत शिस्त असून प्रत्येक जण आदेशाचे पालन करतो. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने नंदुरबार जिल्ह्यात पक्ष मजबूत झाला आहे. भाजपचे नेते खोटे बोलतात. देवाने खोटे बोलवणाऱ्यांना वर बोलावून घेतले तर भाजपत एकही नेता जिवंत राहणार नाही, असेही ते म्हणाले. बबन थोरात, विक्रांत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...