आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:ऑगस्टपूर्वी समन्वयातून प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करणार ; शिक्षक परिषद

नंदुरबार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक परिषदेतर्फे प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधून चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु सदर विषयास दिरंगाई होत आहे. जिल्ह्यातील शिक्षक याबाबत सातत्याने आग्रही असून १५ ऑगस्टपूर्वी या सर्व प्रश्नांना न्याय न मिळाल्यास प्रसंगी शिक्षक परिषदेतर्फे तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी दिला. तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात झालेल्या शिक्षक संपर्क मेळाव्यात ते बोलत होते.

काळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी तालुकास्तरावर संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून तळोदा येथील मेळाव्यात मोठ्या संख्येने शिक्षकांनी उपस्थिती देऊन विविध समस्या मांडल्या. धनंजय सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून सांगितले.भविष्यनिर्वाह निधीच्या हिशेबात ताळमेळ बसत नसून दरवर्षी अचूक व नियमित स्लिप ऑनलाइन मिळाव्यात, जिल्हा कार्यालयाने मंजूर केलेल्या वैद्यकीय बिलाचा लाभ पं.स.ने तत्काळ द्यावा, प्रलंबित प्रश्नांबाबत संथगतीने काम सुरू असल्याचे सांगून शिक्षकांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली.

विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागीय सदस्य आबा बच्छाव, जिल्हा कोषाध्यक्ष शरद घुगे, जिल्हा संघटनमंत्री प्रकाश बोरसे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा कार्यवाह किरण घरटे, सहकार्यवाह अशोक बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश मोरे, सहकार्यवाह किशोर ठाकरे, भगवान मोरे, कार्यालयीन मंत्री जगदीश पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...