आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोगत:इफ्तार पार्टीमुळे सामजिक सलोखा अधिक घट्ट होईल : वळवी

तळोदा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत हा आमचा देश असून जगात सर्वात सुखी मुस्लिम बांधव भारतात आहेत. त्यामुळे कोणी जर या देशाकडे वाकड्या नजरेने बघेल तर तो आमचा शत्रू असून आम्ही देखील देशासाठी प्राण अर्पण करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही, असे मत माैलाना शोएब रजा नुरी यांनी इफ्तार पार्टीवेळी बाेलताना व्यक्त केले.

तळाेदा शहर हे शांततेचे प्रतीक असून इफ्तार पार्टीच्या माध्यमातून शहरात एक चांगला संदेश देण्याचे काम काँग्रेस पक्षाकडून करण्यात आल्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सांगितले. जामा मशीद येथे काँग्रेस पक्षाकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, नगरसेवक संजय माळी, सुभाष चौधरी, शहराध्यक्ष गौरव वाणी, नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, अमिनोद्दीन शेख, मौलाना शोएब रजा, माजी उपनगराध्यक्ष अनिल माळी, प्रकाश ठाकरे, अरविंद पाडवी, शेख अकबर शेख हिदायत, हाजी सरदार, कलीम अन्सारी, मोहन सूर्यवंशी, संजय वाणी आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...