आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलसीबी, सीमा तपासणी पथकाने केली कारवाई:परप्रांतात जाणारा 28 लाखांचा अवैध मद्यसाठा सापळा रचून केला जप्त

नंदुरबार / अक्कलकुवा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेच्या सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीतील गव्हाळी सीमा तपासणी नाक्याजवळ सापळा लावून आयशरमधून परप्रांतात जाणारा २८ लाखांचा दारू साठा जप्त केला. ही कारवाई सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी केली. यात ८ लाख २८ हजार रुपये किमतीचे बिअरचे पाचशे खोके त्यात ३४५ पत्राचे टिन आढळून आले. यात २० लाख रुपये किमतीचे व्हिस्कीचे एकूण ३५० खोके, २६ हजार ४०० रुपये किमतीचे मुरमुरे भरलेल्या प्लास्टिकच्या एकूण ८८ गोण्या, दहा लाख रुपये किमतीचे आयशर वाहन (क्रमांक एम पी-०९ जीई-६५५१) याचा समावेश आहे.

यात एकूण ३८ लाख ४० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून अक्कलकुवा पोलिस ठाणे येथे आयशर वाहनावरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहा. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल गोसावी, पोलिस हवालदार मुकेश तावडे, सजन वाघ, मनोज नाईक, जितेंद्र अहिरराव, अविनाश चव्हाण, किरण मोरे, तुषार पाडवी यांचे पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...