आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गुजरात राज्यात जाणारा साडेआठ लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त

नवापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जाणाऱ्या साडे आठ लाखांचा अवैध दारूसाठा नवापूर पोलिसांनी जप्त केला आहे. यात दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर पोलिसांनी आठवड्याभरात सलग दोनदा कारवाई केली आहे.

नवापूर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी नाकेबंदी करीत कारेघाट गावाचा जंगल अवैध दारू वाहतुक करणारी बोलोरो पिकअप पकडली यात देशी व विदेशी दारूचे २५० खोके जप्त केले. त्याची किंमत ८ लाख ३२ हजार ८०० पिकअप (क्रमांक एम एच ३९ ए डी ११८३) किमत ४ लाख रूपये असा एकूण १२ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वाहन चालक अबिद खान सत्तार खान सिकलीकर (वय ३७, रा.र गल्ली नंबर २, जनतापार्क, नवापूर), व त्याचा सहकारी शैलेश कालू राठोड (वय २८, रा. धनलक्ष्मीपार्क, नवापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...