आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वाघोदा येथील शहीद वीरभाई कोतवाल सेवा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी वीरभाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला. वाघोदा शिवारातील वीरभाई कोतवाल नगरात प्रतिमापूजन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी जि.प.सदस्य गुलाब नाईक, वाघोद्याचे उपसरपंच सुरेश महिरे, ग्रा.पं.सदस्य भामट्या पाडवी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी स्वातंत्र्यसेनानी वीरभाई कोतवाल यांच्या प्रतिमेस वंदन करुन अभिवादन झाले. तसेच त्यांच्या जीवनकार्याची माहिती देवून त्यांच्या कार्यास उजाळा दिला. याप्रसंगी समस्त गुजर नाभिक समाजाचे अध्यक्ष अजय जाधव, सचिव घनश्याम नांदेडकर, उपाध्यक्ष नगीन सोनवणे, दिलीप साळुंखे, समाजाचे पंच राजेंद्र नांदेडकर, तुकाराम सोनवणे, यशवंत होळकर, विभागीय अध्यक्ष प्रदीप सूर्यवंशी, इंजिनिअर संजय परमारकर, दुकानदार युनियनचे अध्यक्ष धनराज वरसाळे, अर्जुन नांदेडकर, पुरुषोत्तम नांदेडकर, रमण नांदेडकर, ज्ञानेश्वर सोनवणे, अशोक नांदेडकर, बबन सोनवणे, जीवन सोनवणे, सुभाष सोनवणे, भरत नांदेडकर, दिलीप सोनवणे, सुभाष सोनवणे, विलास साळुंखे, राकेश सोलंकी, सतीश नांदेडकर, भरत सोनवणे, दीपक नांदेडकर, करण नांदेडकर, शहीद वीरभाई कोतवाल सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण नांदेडकर, उपाध्यक्ष मनोज सोनवणे, सचिव भूषण नांदेडकर आदी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.