आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशभक्तांमध्ये कमालीचा उत्साह:शहाद्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 मंडळांतर्फे विसर्जन

शहादा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील दुसऱ्या टप्प्यातील सातव्या दिवशीचे गणेश विसर्जन मिरवणुका ६ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेपासून महात्मा गांधी पुतळ्याजवळून सुरू झाल्या आहेत. एकूण अकरा गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. गणेशभक्तांमध्ये कमालीचा उत्साह असून उशिरापर्यंत मिरवणुका शांततेत सुरू होत्या. गणेश मंडळांची संख्या बघता पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.

विसर्जन मिरवणूक का सहभाग घेतलेल्या अकरा गणेश मंडळांमध्ये भावसार गणेश मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, संत गोरा कुंभार मित्र मंडळ, राजा गणेश मित्र मंडळ, पटेल मित्र मंडळ, साईबाबा गणेश मित्र मंडळ, सरदार पटेल चौक गणेश मित्र मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळ, क्रांतिवीर भगतसिंग गणेश मित्र मंडळ, मराठा गणेश मित्र मंडळ आदींचा समावेश असून सम्राट गणेश मंडळ व राजे संभाजी मित्र मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग न घेता परस्पर विसर्जन केले आहे. ढोल-ताशांच्या गजरात प्रचंड प्रमाणे गुलालाची उधळण करत जल्लोषात दुसऱ्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. पोलिसांनी संवेदनशील भागांमधील जादा पोलिस बंदोबस्त लावला आहे. जामा मशीद चौकात उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, प्रांत अधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. प्रशासनाने गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे वाजंत्रीला बंदी केल्याने गणेश मंडळी पारंपरिक वाजंत्रीचा उपयोग केला आहे. उशिरा रात्रीपर्यंत मिरवणुका शांततेत सुरू होत्या.

बातम्या आणखी आहेत...