आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:कायमस्वरूपी स्थलांतर थांबवण्यासाठी ‘रोहयो’तूनच वैयक्तिक योजना राबवा; बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश

नंदुरबार9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील नागरिकांचे होणारे स्थलांतर कायमस्वरूपी थांबवण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून त्याचा लाभ पात्र लाभार्थींना द्यावा, असे निर्देश रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सकाळी रोहयो आढावा बैठकीचे आयोजन नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. या वेळी ते बोलत होते. बैठकीस प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रदीप कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे, ‘रोहयो’चे राज्य प्रशिक्षण समन्वयक नीलेश घुगे आदी उपस्थित होते.

श्री. नंदकुमार म्हणाले की, गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा. याकरिता कृषी, वने, जलसंपदा, पशुसंवर्धन तसेच इतर विभागांची मदत घेऊन नागरिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.

लोकांचे वैयक्तिक उत्पन्न वाढीवर भर देण्याच्याही केल्या सूचना
जमिनीची पाणीपातळी वाढवण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे द्यावीत. त्याचबरोबर कुरण विकासाकडे अधिक लक्ष देण्यात यावे. रोजगार हमी योजनेच्या मनुष्य दिवस निर्मितीबरोबर लोकांचे वैयक्तिक उत्पन्न वाढीवर भर देण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपजिल्हाधिकारी मोरे यांनी प्रास्ताविक केले.

बातम्या आणखी आहेत...