आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महाेत्सव विविध कार्यालयांकडून स्पर्धा आयाेजनासाठी पुढाकार:समूह नृत्यात डी.आर. हायस्कूल प्रथम

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, शहर पोलिस ठाणे व नगरपालिका कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत श्रीमती डी.आर. हायस्कूलच्या संघाला समूह नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळाला. समूह नृत्य प्रकारात विशाल सूर्यवंशी, गिरीश ठाकूर, लक्ष मोरे, अभिषेक पवार, द्वारकाधीश घमंडे, भावेश देवरे, हरीश वसईकर, यश बोरसे, सोहन घमंडे, ओम कुवर यांचा समावेश आहे. त्यांना नृत्य मार्गदर्शक राहुल टिळंगे, नृत्य विभागप्रमुख विशाल मच्छले, कलाशिक्षक देवेंद्र कुलकर्णी व नृत्य समिती सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्वांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील, पालिका मुख्याधिकारी अमोल बागुल व अन्य मान्यवरांच्या हस्ते ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवले. कलाकार व मार्गदर्शक शिक्षकांचा स्वातंत्र्य दिनी कार्याध्यक्ष परीक्षित मोडक, अध्यक्ष नरेंद्र सराफ, सचिव प्रशांत पाठक, सदस्य पंकज पाठक, श्रीराम मोडक, मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक विपुल दिवाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव
स्वातंत्र्याच्या महाेत्सवाचे औचित्य साधून आयाेजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांत उत्साह व चैतन्य पसरल्याचे दिसून आले. स्पर्धेत यश मिळवण्यासाठी चढाओढही दिसली.

बातम्या आणखी आहेत...