आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळाव्याचे आयोजन:नारीशक्ती निर्धार मेळाव्यात महिलांनी घडवले संस्कृतीचे दर्शन‎

नंदुरबार‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार‎ शहरातील लायन्स फेमिना क्लब व विविध‎ समाजातील सर्व महिला मंडळ, संघटनांनी‎ एकत्रित असा नारीशक्ती निर्धार महिला‎ मेळावा कन्यादान मंगल कार्यालयात झाला.‎ हिलांनी एकत्रित येवून एकमेेकांना आपापल्या‎ संस्कृतीची ओळख करुन दिली.‎ मेळाव्याचे आयोजन डॉ. तेजल चौधरी‎ यांनी केले. मेळाव्यास जिल्हाधिकारी मनिषा‎ खत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक‎ पी.आर.पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ.प्रसाद‎ अंधेरे, नुतनवर्षा वळवी, नंदा सोनार,‎ एपीआय नयना देवरे, शीतल चौधरी, हिना‎ रघुवंशी तसेच नंदुरबार शहरातील सर्व‎ समाजातील महिला मंडळाचे अध्यक्ष व‎ महिला उपस्थित होत्या.

यावेळी स्त्रियांमध्ये‎ आढळणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाची‎ तपासणी नाममात्र दरात करण्यात आली.‎ ओंकार योगा गृपच्या श्रीकांता मोदाणी व‎ प्राची अग्रवाल यांनी योगा प्रात्यक्षिक‎ दाखवले. कार्यक्रमानंतर सर्व महिलांनी सोबत‎ रंगपंचमी खेळून आनंद लुटला. घुमर‎ महोत्सव समितीचे कुणाल वीर व राखी‎ निलेश तवर यांच्याकडून घुमर‎ महोत्सवासाठी ज्यांनी भरीव योगदान दिले त्या‎ सर्वांचा सत्कार करण्यात आला. महिलांनी‎ विविध नृत्य सादर करून आपल्या संस्कृतीचे‎ दर्शन घडवले.‎

बातम्या आणखी आहेत...