आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष प्रवेश:नवापूर येथे भाजप, ‘राष्ट्रवादी’च्या 2 पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश

नवापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप व राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असून, दोन्ही पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शहरातील भाजपचे व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या नेतृत्वात व पदवीधर मतदारसंघाचे आमदार डाॅ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आमदार नाईक मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे प्रश्न सोडवत आहेत. त्यांना मानसन्मान दिला जात आहे. तसेच विविध विकास कामे केली जात असल्याने काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी नारायण गिरधर सुतार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपत मानसन्मान मिळत नसल्याने पक्ष सोडल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागातील युवक नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष सूरज विश्वास गावित यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मला माझ्या भागाचा विकास करायचा आहे. आमदार नाईक विकासाची कामे करत असल्याने मतदारसंघाचा विकास होईल असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...