आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मशानभूमीत मृतदेह ठेवून लाकडांसाठी भटकंती:नवापुरात 3 कुटुंबीयांना मृतदेह जाळण्यास मिळाले नाही सरण

नवापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर शहरातील पालिकेच्या स्मशानभूमीत सोमवारी तीन मृतदेह अंत्यविधीसाठी आले होते. त्या मृतदेह जाळण्यासाठी लाकडं मिळाले नाही म्हणून दुःखात असलेल्या कुटुंबीयांना प्रेत बाजूला ठेवून स्वतःच्या पैशाने मृतदेह जाळण्यासाठी लाकडांची शोधाशोध करावी लागली.नवापुरात सरणापेक्षा मरण स्वस्त झाले असून, नवापूर पालिकेचे अधिकारी व सत्ताधारी हे माणसाच्या मृत्यूनंतरदेखील त्यांचे सरणासाठी हाल करीत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. स्मशानभूमीत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक घेऊन आले होते. तेथे अत्यंत विदारक चित्र दिसून आल्याचे नागरिकांनी सांगितले.

नियमानुसार नगर परिषदे कडून ५०० रुपयांची पावती घ्यावी लागते. पावती फडण्यास गेलेल्या दुःखी परिवाराला लाकूड नसल्याचे सांगून तुम्हाला स्वतःच लाकडाची व्यवस्था करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. यावर नागरिक चांगलेच संतप्त झाले.

सरणाविषयी विचारले असता मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांना विचारणा केली असता लाकडांचा ठेकेदार बाहेरगावी गेला आहे. संबंधित अधिकारी याबाबत नियोजन करत आहे. लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येईल. असे उत्तर दिले. नवापूर शहरात तीन ठिकाणी मयत झाल्याने एकाच वेळेस ३ मृतदेह अत्यंसंस्कारासाठी स्मशानभूमीत आल्याने नागरिकांना लाकूड नसल्याचे निदर्शनात आले.

बातम्या आणखी आहेत...