आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य परिवहन महामंडळाच्या बसला शहादा- धडगाव रस्त्यावर अपघात झाला आहे. वळण रस्त्यावर चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस खोल नाल्यात पडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा बस (एमएच २०, आरएल ३५१६) ही धडगावहून चालक अरविंद सावताळे हे १.३० आपल्या जवळील वाहन शहादाकडे घेऊन येत असताना काकर्दा गावाजवळील देवबारी घाटात अपघात झाला आहे. या बसमध्ये धडगाव येथून २५ प्रवासी बसले होते; परंतु चालकाच्या संतर्कतेमुळे प्रवाशांचे जीव वाचले आहे.
अपघाताची माहिती मिळताच शहादा विभागीय नियंत्रक कक्षातील अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह बस घेऊन दाखल झाले. प्रवाशांची विचारपूस करून त्याना पुढील मार्गस्थ करण्यात आले. धडगाव- शहादा हा मोठ्या प्रमाणात घाट रस्ता असल्याने वळणावर समोरून येत असलेले वाहन दिसत नाही. या कारणामुळे देवबारी घाटातील वळण रस्त्यावर समोरून अचानक चारचाकी वाहन आले. त्याला वाचवण्याचा प्रयत्न बस चालकाने केला. यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खोल नाल्यात गेली. तर नागरिकांनी तत्काळ मदत करून प्रवाशांना बाहेर काढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.