आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर तळोदा येथे आमदार कार्यालयाच्या प्रांगणात भाजपतर्फे निषेध व्यक्त करण्यात आले. तर याच विषयावर दोन दिवसांपूर्वीच भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले होते. गटबाजीमुळे दोनदा आंदोलन झाल्याची म्हटले जात आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यालयाच्या आवाराचा प्रांगणात अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
या वेळी भाजपचे भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, शाम राजपूत, गौरव वाणी, रामानंद ठाकरे, कैलास चौधरी, शिरीष माळी, रसिलाबेन देसाई, भारतीबाई कलाल, बळीराम पाडवी अमनोद्दिन शेख. भय्या चौधरी, राजकपूर मगरे आदिंसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, भाजपकडून दोन दिवसापूर्वी देखील अजित पवार यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले होते. पक्षात गटबाजी नसल्याचे शहराध्यक्ष योगेश चौधरी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.