आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक विषय जमिनीच्या आरक्षण बदलाचेच

नंदुरबार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या सभेत बहुतांशी विषय जमिनीचे आरक्षण बदलण्याबाबतचे आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेता चारूदत्त कळवणकर यांनी करून जमिनी आरक्षण बदलल्याने जमीन मालकांना कोट्यवधींचा फायदा होणार आहे. या अनुषंगाने या जमीन मालकांकडून येत्या पाच वर्षांचा नंदुरबार पालिकेला सर्व मालमत्ता कर भरून घ्यावा, अशी मागणी केली. तर या विषयांवर सभेत आरोप प्रत्यारोपही झाले. नगरपालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात शनिवारी सर्वसाधारण सभा झाली. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी अध्यक्षस्थानी होत्या.

सभेत नगरपरिषदेची सन २०२२मध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया पार पडणे कामी येणाऱ्या अंदाजित खर्चास मंजुरी दिली. चार क्षेत्र शेती क्षेत्रातून वगळून रहिवास क्षेत्रास मंजुरी दिली. राजयोग नगरात खडीकरण कामांच्या १७ लाख रुपये खर्चास मंजुरी दिली. शहीद हुतात्मा स्मारक उद्यान देखभाल दुरुस्ती, परिरक्षणासाठी अनुभवी संस्थेस देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

श्रीमती कमलाबाई मराठे व्यापारी संकुलावरील हॉल शैक्षणिक मार्गदर्शन, अभ्यासिका, मोफत वाचन कक्ष प्रयोजनासाठी भाडेकराराने देणार आहे. यावर आलेल्या अर्जास मंजुरी देण्यात आली. तसेच नगर परिषदेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रात विविध कंपोनंटनिहाय दुरुस्ती कामे तसेच नवीन साहित्य आणून बसवण्याच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी दिली. जियन सिटी पार्कमध्ये रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामांच्या ३९ लाख २६ हजार रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. स.नं. हायस्कूल मैदानाचे आरक्षण वगळून दुरुस्ती ठरावास मंजुरी दिली. परवेज खान, गजेंद्र शिंपी, कुणाल वसावे, किरण रघुवंशी, कैलास पाटील चर्चेत सहभागी झाले.

मुख्याधिकारी अमोल बागुल म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या निमित्ताने पुतळयांना रोषणाई करण्यात येणार आहे. १० ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यावर भर दिला जाणार आहे. घरांवर राष्ट्रध्वज लावताना उचित सन्मान द्यावा. तसेच सौर ऊर्जेचा नगरपालिकेला लाभ काय, असा प्रश्न प्रशांत चौधरी यांनी विचारला. प्रदूषणमुक्त, देशातील औष्णिक ऊर्जा कमी करून पर्यावरणाला प्रोत्साहन देणे हेच सौर ऊर्जेमागचे ध्येय आहे, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...