आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकअदालत:लोकअदालतमध्ये  हजार 928 प्रकरणे तडजोडीतून निकाली; 2 कोटी 69 लाख 99 हजार 854 रुपये केले वसूल

नंदुरबार10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोडक्षम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात दावे प्रकरणे, वाहतूक नियमन प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणांमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व बँका यांचे थकीत बिले यांची १ हजार ९२८ प्रकरणे शनिवार दि.७ मे रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली. यात २ कोटी ६९लाख ९९ हजार ८५४ रुपये वसुल करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्या.आर.एस. तिवारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डि.व्ही हरणे यांच्या उपस्थितीत नंदुरबार मुख्यालयात जिल्हा न्यायाधीश १ ए.एस.भागवत, वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. एस. टी. मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.व्ही.जी. चव्हाण, वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्या. आर. एन. गायकवाड, कनिष्ठ स्तर १ले सह दिवाणी न्या. वाय. के. राऊत, कनिष्ठ स्तर २ रे सह दिवाणी न्या. एन. बी. पाटील यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.

त्यांच्या मदतीसाठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड. एन. डी. चौधरी, अ‍ॅड.यु. एच. केदार, अ‍ॅड. सीमा खत्री, अ‍ॅड. अविनाश पाटील, अ‍ॅड. गणेश बैरागी, अ‍ॅड. दत्तात्रय कदमबांडे, अ‍ॅड. विनया मोडक, अ‍ॅड. आर. ए. मोरे, अ‍ॅड. ए. बी. कढरे, अ‍ॅड. पुष्पेद्र पाटील, अ‍ॅड. एन. एल. गिरासे, अ‍ॅड. दीपाली रघुवंशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. सदर लोकन्यायालयात नव नियुक्त न्यायिक अधिकारी एस. एस. बडगुजर, ए. आर. कुलकर्णी, एस. बी. मोरे, पी. एम. काजळे, आरती बनकर, एम. बी. पाटील, एस.आर.पाटील उपस्थित होते. न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...