आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवापूर तालुक्यातील वडझाकन गावामध्ये दारूच्या व्यसनामुळे गावातील सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब होत असल्यामुळे महिला बचत गट सदस्यांनी गावात असलेले अवैध दारूचे दुकाने तसेच हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य जमा करून ग्रामपंचायत समोर जाळून होळी केली. वडझाकन गावात गेल्या २० ते २५ वर्षांपासून हातभट्टी दारूमुळे गावातील महिला त्रस्त झाले होत्या. वारंवार बचत गट महिला सभांमध्ये तक्रार करत होत्या. पती दारू पिऊन मारहाण करतो, रोजंदारीचे आणलेले पैसे हिसकवून दारू पिऊन घरात धिंगाणा घालतात. शेतात पिकवलेला धान्य विकून दारूचे व्यसन करतात.
आता तर काही गावातले तरुण मुलेही मद्यधुंद अवस्थेत फिरत आहेत. दारूमुळे अनेक महिलांचे संसार रस्त्यावर आले आहेत अशी तक्रार लोकनियुक्त सरपंच अनिता वसावे यांच्याकडे महिलांनी केली. त्यानंतर सरपंच अनिता वसावे यांनी २६ जानेवारीच्या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी संध्याकाळी महिला ग्रामसभा घेऊन गावात दारूबंदीचा ठराव केला.
३१ जानेवारीनंतरपर्यंत अवैध दारू हातभट्ट्या बंद करण्याचा इशारा दिला. त्याच अनुषंगाने १ फेब्रुवारीला सरपंच अनिता वसावे यांच्या नेतृत्वाखाली ६० ते ७० महिला व बचत गट महिलांनी गावातील ९ ठिकाणी अवैध दारू हातभट्टी व एक अवैध बियर आणि कॉटर विकणारे दुकान अशा १० ठिकाणातील साहित्य गोळा करून ग्रामपंचायतीच्या आवारात आणून जाळून खाक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.