आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यार्पण सोहळा:नटावदकर विद्या मंदिराच्या नूतन इमारतीचे विद्यार्थ्यार्पण

नंदुरबार8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचलित एकलव्य विद्यालय ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय तसेच काही शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्या मंदिराच्या नूतन इमारतीचा विद्यार्थ्यार्पण सोहळा सोमवारी झाला. दीपप्रज्वलन, माल्यार्पण व इमारतीचे उद्घाटन हे तिन्ही कार्यक्रम रिमोट कंट्रोल ने झाले. याचे संयोजन मिलिंद वडनगरे यांनी केले. विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यार्पण झाले. विद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या आधुनिक जीवशास्त्र भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र प्रयोगशाळांचे उद्घाटन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार सुधीर तांबे व आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाला. व्यासपीठावर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.