आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘टेकफिएस्टा 2022’ प्रदर्शनाचे उद्घाटन ; शहाद्याच्या डी.एन. पटेल अभियांत्रिकीत केले ऑयोजन

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल विभागाच्या वतीने ‘टेकफिएस्टा- २०२२’चे आयोजन करण्यात आले ऑहे. त्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलित करुन झाले. या प्रसंगी संस्थेचे सदस्य रमाकांत पाटील व विविध विद्या शाखांचे प्राचार्य उपस्थित होते. या ‘टेकफिएस्टा’ अंतर्गत टेक्निकल व नॉन टेक्निकल असे विविध १९ प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या सर्व कार्यक्रमांमध्ये निकष लावण्यात आले. त्यानंतर प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी कुवर हिने केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा.एच.जी. पाटील, ‘टेकफिएस्टा’चे संयोजक प्रा.के.टी. पाटील, डॉ.ए.एस. पटेल, प्रा.हरीश चव्हाण, प्रा.उमेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान या कार्यक्रमातील सहभागामुळे विद्यार्थ्यांना अनेक अनुभव घेता ऑले. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडली असून ऑत्मविश्वासही वाढला, असे निरीक्षJ सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, अकॅडमिक डीन डॉ.डी.एम. पटेल, ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.आर.एस. पाटील, कुलसचिव डी.एन. पाटील, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले ऑहे.

बातम्या आणखी आहेत...