आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:शहादा येथील जखमी बालिकेचा अखेर मृत्यू; अपघातातील मृतांची संख्या पाेहाेचली सहावर

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या बाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्यावर मीरा प्रताप लाॅनजवळ आयशर ट्रक व खाजगी लक्झरी बस यांच्यात झालेल्या अपघातात जखमी व अत्यवस्थ असलेल्या उर्मिला किशोर भिल (वय ५) रा.पाडळदा हीची मृत्यूशी झुंज अपुरी ठरली. शुक्रवारी मध्यरात्री तिचा मृत्यू आेढवला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या सहावर पाेहाेचली आहे.

आयशर ट्रकमधून आदिवासी मजुरांना घेऊन परप्रांतात नेत असताना शहादा शहराबाहेरील वळण रस्त्यावर मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसशी ट्रकची समोरासमोर धडक झाली हाेती. या भीषण अपघातात चार मजूर व लक्झरी बस चालक अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यात अत्यवस्थ असलेल्या उर्मिला भिल या पाच वर्षाच्या बालिकेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू हाेते. तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. पण अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तालुक्यातील पाडळदा येथील एकाच कुटुंबातील माय-लेकीसह मुलालाही जीव गमवावा लागल्याची घटना घडल्याने परिवारावर संकट ओढवले आहे. येथील पोलिसांत पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी बस चालक अब्दुल रहिम कोगोवारे (वय ४८) रा.जुनागड याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...