आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आमदार पाडवींची पाहणी

तळोदा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत आमदार राजेश पाडवी यांनी रुग्णालयाची पाहणी करत जिल्हा शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे यांना सर्व प्रकार कळवला. सकाळी येऊन उपाययोजना करा, अशा सूचना दिल्या. परंतु डॉ. शिंदे यांनी सकाळची वाट न पाहता लगेच तळोदा उपजिल्हा रुग्णालय गाठून उपजिल्हा रुग्णालयाय प्रशासनाला सूचना दिल्या. समस्या सोडवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले.

मंगळवारी रात्री १०:३०च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे आठ महिला आपल्या नुकत्याच जन्मलेल्या नवजात बालकांसोबत मुक्कामी होत्या. वीज गेल्याने मातांना, त्यांच्या नवजात बालकांना असह्य उकाडा सहन करावा लागत असल्याचा व्हिडिओ आमदारांना पाठवून उपजिल्हा रुग्णालयात सद्य:स्थिती काय आहे, याची माहिती अवगत करून तक्रार केली. याची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी भेट देऊन रुग्णांची समस्या जाणून घेतली.

जनरेटर कुचकामी
उपजिल्हा रुग्णालयात अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यास ऑपरेशन थिएटरमध्ये अडचण येऊ नये म्हणून जनरेटर ठेवण्यात आले असले तरी नियमित ऑपरेशन होत नसल्याने इतर वेळी रुग्णाचा खोलीत वीजपुरवठा देणे आवश्यक अपेक्षित असताना असे का होते याबाबत आमदार राजेश पाडवी यांनी नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांना संपर्क साधून त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा वास्तव स्थितीची माहिती दिली. तसेच सुविधांचा आढावा घेतला.

बातम्या आणखी आहेत...