आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेसळचा संशय:नंदुरबारातील तीन हाॅटेल्समधील मिठाईंची तपासणी; नमुनेही घेतले

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तीन हाॅटेल्समधील मिठाई, खाद्य पदार्थांची अन्न व आैषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. त्यात जय खेतेश्वर स्वीट्स, भारती फूड्स आणि हरी ओम खेतेश्वर स्वीट्स या तीन हॉटेल्सचा समावेश आहे. या हॉटेलांमधून मोतीचुराचे लाडू, इमरती, खवा आणि नवरतन चिवडा या अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

मुदतीचा उल्लेख नाही
जय खेतेश्वर स्वीटस्, हरी ओम खेतेश्वर स्वीटस् या दुकानांमध्ये मिठाई विक्रेत्यांनी मिठाईवर ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद केला नसल्याने व अन्नपदार्थ किती दिवस वापरावे, याबाबत माहिती दर्शनी भागात लावली नसल्याने या दोन्ही दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व आैषध प्रशासनाच्यातर्फे सांगण्यात आले.

केमिकलमिश्रित गुलाल विक्री करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
दरम्यान, नंदुरबार शहरात पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर गुलाल विक्री होत असून विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेेेले व्यापारी बलवंत जाधव यांना गुलालाचा त्रास झाला. गुलालामुळे आरोग्य धोक्यात येत असल्याने केमिकल मिश्रीत गुलाल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. अनंत चतुदर्शीला मोठ्या गणपतींचे विसर्जन होणार असल्याने पोलिसांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे,अशी मागणी होत आहे.

भेसळीच्या शक्यतेने तपासणी मोहीम
सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनातर्फे या अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या संबंधित आस्थापनांच्या तपासण्या व नमुने घेण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...