आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राची सभापतींकडून पाहणी करून सूचना

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तळागाळातील घटकांपर्यंत शासनाच्या आरोग्य विभागाच्या योजना पोहोचवा, आरोग्य केंद्र परिसरात स्वच्छता ठेवा, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात थांबून दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी, अशी सूचना नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे यांनी केली.

शहादा तालुक्यातील वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे, सुदाम पाटील यांनी नुकतीच भेट दिली यावेळी सरपंच जयाबाई ठाकरे उपसरपंच अभय गोसावी, ग्रामपंचायत गटनेते तथा माजी सरपंच दीपक पाटील, ग्रामविकास अधिकारी भगवान देसले, ग्रामपंचायत सदस्या कल्पना, माेहिते, दीपक ठाकरे, सुनील माळी, आदींसह पदाधिकारी उपस्थितीत होते. उपसरपंच अभय गोसावी यांनी आरोग्य केंद्रासाठी ट्रान्स्फरची मागणी केली. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार सुरसे, डॉ. राजन दुगडसह कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...