आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रशासन:मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ध्वनिक्षेपकासंदर्भात दिल्या सूचना

शहादा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे पोलिस स्टेशन कार्यालयात गुरुवारी दुपारी १२ वाजता शहरासह परिसरातील मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची बैठक प्रभारी पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

बैठकीला पोलीस निरीक्षक आर.टी.भावसार, प्रेस मारुती मंदिर ट्रस्टचे रोहिदास चौधरी, सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे राजेंद्र अग्रवाल, आई माळसादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. गणेश सोनवणे, गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे राजेश भट, लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष योगेश पाठक, हिंगलाज माता मंदिर ट्रस्टचे शिरीष भावसार, केदारेश्वर मंदिर प्रकाशा ट्रस्टचे मोहन पटेल, महावीर जैन पंथाचे दिलीप जैन, चिंतेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे बापू पाटील, पिंगणे येथील नागेश्वर मंदिर, तिखोरा येथील पद्मावती मंदिर ट्रस्टचे, सदस्य उपस्थित होते.

सध्या राज्यात मशिदीवरील भोंगे बाबत वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये राज्यात भोंग्या विरोधात आंदोलन केली जात आहेत. त्या आधारावर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. प्रभारी पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी बोलतांना रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भाेग्यांना पूर्णतः बंदी आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये कायद्याचे पालन करून ५० डेसीबल पेक्षा कमी आवाजात ध्वनिक्षेपक वाजवण्यास सांगितले आहे. त्या आधारावर सर्वांनी कायद्याचे पालन करून शहादा शहरातील शांतता कायम ठेवावी. मंदिरे, मशिदे, विविध धार्मिक प्रार्थना स्थळांना कायदा लागू असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आव्हान केले. मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या सूचना मांडल्या. त्यात योगेश पाठक, रोहिदास चाैधरी, राजेंद्र अग्रवाल, यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...