आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:लोकशाही दिनात अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचे निर्देश ; चार जणांचे पाच अर्ज प्राप्त

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाही दिनी चार जणांचे पाच तक्रार अर्ज प्राप्त झाले. या चार पैकी एका अर्जावर आठवडयात कारवाई करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी पालिकेला दिले. तसेच अन्य तक्रार अर्जावर अहवाल मागविण्यात आला आहे. एका शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली नाही. तसेच त्या शेतकऱ्याला किसान क्रेडीट कार्ड मिळाले नाही, अशी तक्रार होती. या सर्व तक्रारींवर सुनावणी झाली. तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सातपुते, एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच पालिका बांधकाम विभागाचे अधिकारी गावित यांच्यासह विविध खात्याचे खाते प्रमुख उपस्थित होते. महेंद्र वाणी या शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली नाही. या शेतकऱ्याने सर्व कागदपत्रे जोडली होती. हे प्रकरण सहकार क्षेत्राशी निगडीत असल्याचे खांदे यांनी सांगितले. तसेच या अर्जावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पीक कर्ज मुक्तीसाठी आधीचे कर्ज माफ असायला हवे. तरच कर्जमुक्ती मिळू शकते. हेमराम केशाराम जाट यांनी उच्च दाबाच्या वीज पुरवठामुळे धोका निर्माण झाल्याने पोल स्थलांतरीत करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...