आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील दत्त जयंती निमित्ताने भरत असलेल्या यात्रोत्सवाचा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी अंतिम आढावा घेऊन पाहणी केली. यात्रेमध्ये सुरक्षा, स्वच्छतासह लंपीसाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला दिनांक ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे. या तयारीचा आढावा त्याच बरोबर विविध विभागातील अधिकाऱ्यांनाकडून नियोजनासंदर्भात माहिती जाणून घेतली.
या वेळी चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, विद्युत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता उपअभियंता भूषण जगताप आदी उपस्थित होते.
रायटिंग शूज हेल्मेटची व्यवस्था हवी
जिल्हाधिकारी यांनी पशुसंवर्धन लंपी संदर्भात जनजागृती करण्याचे सूचना केल्या. तसेच आरोग्य विभागाकडून आरोग्य संदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली त्याचबरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी यांनी १०८ ची मागणी केली. अश्व रायडिंग करणाऱ्या शोकनांसाठी रायटिंग शूज हेल्मेटची व्यवस्था करण्याची सूचना केली.
सुरक्षेसाठी ७० सीसीटीव्ही कॅमेरे
जयपालसिंह रावल यांनी घोडेबाजार व यात्रेत होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ७० सीसीटीव्ही लावले जाणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर सीसीटीव्ही कंट्रोल रूम जवळ पोलिस कर्मचारी २४ तास तैनात ठेवण्याचे सांगितले. पोलिसांना हेल्पलाइन नंबर जाहीर करून चौका चौकात लावण्याच्या सूचना दिल्या.
२४ तास असेल विजेचा पुरवठा
वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अमित शिवलकर यांनी यात्रा कालावधीत अतिरिक्त ट्रांसफार्मरची व्यवस्था त्याचबरोबर वीज २४ तास उपलब्ध राहील, यासाठी कर्मचारी पथक नेमल्याची माहिती दिली. तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी महसूल विभागाकडून नियंत्रण कक्ष स्थापणार असून या कक्षातूनच यात्रेतील सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.
मोबाइल टॉयलेटचीही व्यवस्था
ग्रामसेवक गावित यांना पाणी स्वच्छता याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना करून मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. पोलिस प्रशासनाला पार्किंग व्यवस्था त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेची चोक जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना केले. मंदिर प्रशासनाने स्वयंसेवक नेमणूक भाविकांना दर्शनासाठी योग्य व्यवस्था करून देण्याचे ही त्यांनी नमूद केले. भाविकांसाठी स्वच्छतागृह व पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करावे असेही सांगितले.
अवजड वाहनांना बंदी : अवजड वाहने यात्रा कालावधीत वर्ज करण्यासंदर्भात त्याचबरोबर अग्निशामकचे बंब तत्पर ठेवावेत. त्याचबरोबर सरपंच पृथ्वीराज रावल यांनी प्रत्येक दुकानदारांना डस्टबिन देणार व हॉटेल व्यवसायिकांना अग्निविरोधक यंत्र देखील देणार असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.