आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या बदल्या:आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण; 12,490 शिक्षकांचे अर्ज, राज्यातील 3,780 शिक्षक स्वत:च्या जिल्ह्यात परतणार

नंदुरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सुमारे ३ हजार ७८० जिल्हा परिषद शिक्षकांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्हा परिषद स्तरावर शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत आदेश दिल्याची माहिती राज्य बदली समन्वयक तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.

राज्यात दरवर्षी शिक्षकांच्या आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदलीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येते. कोविडच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते; मात्र शासनाने विशेष समितीची स्थापना करून विनय गौडा यांना बदली समन्वय समितीच्या प्रमुखपदी नियुक्त केले. १० ऑगस्टपूर्वी राज्यातील सर्व शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन व जिल्हा अंतर्गत ऑफलाइन बदल्या करण्याबाबत समितीला अधिकार दिले होते. त्यानुसार अनेक वर्षे स्वतःचे गाव व परिवारापासून लांब नोकरी करणाऱ्या शिक्षकांची बदली प्रक्रिया हाती घेत घर वापसीचा मार्ग मोकळा केला. राज्यातील मराठी व उर्दू माध्यमाच्या एकूण १२ हजार ४९० शिक्षकांनी स्व जिल्ह्यात बदलीसाठी ऑनलाइन केलेल्या अर्जांची छाननी करण्यात अाली अाहे. यात जिल्हास्तरावर इच्छुक शिक्षकांच्या याद्या करून प्राधान्यक्रमानुसार बदल्या करण्यात अाल्या अाहेत.

जिल्हा व माध्यमनिहाय बदलीने जाणारे शिक्षक व कंसात येणारे शिक्षक पुढीलप्रमाणे अाहेत :

  • मराठी माध्यम : अहमदनगर जिल्ह्यातून ४१ (६२), अकोला २९ (१४), अमरावती २६ (१५), औरंगाबाद ८९ (४५), भंडारा २६ (६७), बीड ५१ (४१), बुलडाणा ३१ (५६), चंद्रपूर २२ (९५), धुळे ४६ (७२), गडचिरोली ४९ (८), गोंदिया २०(३२), हिंगोली ३६ (९७), जळगाव २६ (२५), जालना ८५ (६१), कोल्हापूर ४१ (३२), लातूर ४ (४), नागपूर ११ (४४), नांदेड ३१ (८२), नंदुरबार ९९ (१२५), नाशिक ८३ (८७), उस्मानाबाद २६ (३८), पालघर ११ (२४), परभणी ४३ (१२२), पुणे ४८ (६५), रायगड २४७ (१८), रत्नागिरी ३२४ (६), सांगली ७१(२८), सातारा ४० (१०९), सिंधुदुर्ग ५ (७), सोलापूर ३७ (९८), ठाणे ५५ (४७), वर्धा ८(३१), वाशीम ७ (७), यवतमाळ ६५(१६३).
  • उर्दू माध्यम : अहमदनगर ५ (३), अकोला २ (१४), अमरावती ७ (४), औरंगाबाद ८ (८), बीड १ (०), बुलडाणा ७ (९), हिंगोली १ (१), जळगाव ५ (५), जालना ६ (७), कोल्हापूर १ (०), लातूर १ (१), नाशिक १ (१), उस्मानाबाद १ (१), परभणी ० (४), सोलापूर १ (१), वाशीम १ (१) आणि यवतमाळ १५ (३).
बातम्या आणखी आहेत...