आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय‎:पपई पिकाला 9 रुपये किलो भाव देण्याचे जाहीर‎

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा‎ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात फळ उत्पादक‎ बागायतदार शेतकरी व व्यापारी‎ यांच्यात दिनांक ३ जानेवारी रोजी‎ दुपारी बारा वाजता सामूहिक बैठक ‎खेळीमेळीच्या वातावरणात होऊन‎ ४ जानेवारीपासून पपई पिकासाठी‎ नऊ रुपये किलो भाव ठरवण्यात‎ आला आहे, अशी माहिती कृषी‎ उत्पन्न बाजार समितीचे सचिव‎ हेमंत चौधरी यांनी दिली.

‎ बैठकीला फळ बागायतदार‎ उत्पादक शेतकरी संस्थेचे‎ जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील,‎ जयनगर येथील शेतकरी भगवान‎ पाटील, वरुळ-कानडी येथील‎ शेतकरी अशोक पाटीलसह अन्य‎ शेतकरी तसेच व्यापाऱ्यांमध्ये हाजी‎ नाजीम हाजी, फारुख हाजी, मुल्ला‎‎ शेख, राजस्थानी व्यापारी जोगाराम,‎ प्रकाशराम व इतर व्यापारी उपस्थित‎ होते.

सध्याच्या परिस्थितीत‎ असलेले पपईचे उत्पादन‎ शेतकऱ्यांना त्यासाठी लागणारा‎ खर्च बघता शेतकरी पुन्हा आर्थिक‎ अडचणीत येत होते. शेतकरी गेल्या‎ एक महिन्यात शेतकरी व‎ व्यापाऱ्यांच्या बैठकीत साडेसात‎ रुपये किलो हा भाव जाहीर करून‎ तोडगा काढला होता. मात्र पुन्हा‎ भाव वाढ करण्यात यावा, असा‎ पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला होता.‎ त्यानुसार निर्णय घेण्यात आला.‎

समन्वयातून काढला मार्ग‎‎
शेतकरी व व्यापारी यांनी आपसात‎ तडजोड करून पपईला नऊ रुपये‎ किलो भाव देऊन चांगला मार्ग‎ काढला आहे. यात दोघांचे हित‎ जोपासण्याच्या प्रयत्न केला आहे.‎ -अभिजीत पाटील, जिल्हाध्यक्ष,‎ फळबागातदार उत्पादक शेतकरी संस्था‎

बातम्या आणखी आहेत...