आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:अल्पसंख्याक कमिटीत प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जैन समाजाची मागणी

नंदुरबार13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकल जैन समाजातर्फे अल्पसंख्याक कमेटीत प्रतिनिधीत्व मिळावे या मागणी करिता जैन समाजातर्फे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना निवेदन देण्यात आले.जैन समाजाला अल्पसंख्यांक दर्जा मिळाला. तद्नंतर केंद्र शासनाने केंद्रीय स्तरावर जैन समाजाला अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे घोषित केले.

महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक कल्याण- कमिटी आहे. परंतु त्या कमिटीत जैन समाजाला प्रतिनिधीत्व नाही. एका विशेष समाजाचे त्या कमिटीवर अधिपत्य आहे. वास्तवीक पाहता सर्व अल्पसंख्यांक समाजाला त्या कमिटीत प्रतिनिधित्व दिले गेले पाहीजे.

जैन समाजाचे कमीत कमी २ प्रतिनिधी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या कमिटीत समाविष्ट करण्यासाठी शासनस्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी. तसेच अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी शासनाकडून निधी पाठवीला जातो, त्यात देखील योग्य तो भाग जैन समाजाला मिळावा. निवेदनावर सकल जैन समाजाचे सुरेश जैन, विरल कुवाडिया, पदम पाटोदी, मदनलाल जैन, प्रकाश कोचर, जेठमल अंबानी यांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...