आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी नंदुरबार -२ मध्ये २०२२-२०२४ या शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेसाठी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत असल्याची माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.पातोडे यांनी दिली आहे. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी हा जिल्ह्यातील नवापूर व नंदुरबार तालुक्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता पाचवीत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत शिकत असावा. विद्यार्थ्याचा जन्म १ मे २०११ पूर्वी झालेला असावा. ३० एप्रिल २०१३ नंतर झालेला नसावा.
ही अट सर्वांसाठी लागू असेल. सन २०२०-२०२१, २०२१-२०२२ व २०२२-२०२३ या वर्षांत विद्यार्थ्याने तिसरी, चौथी व पाचवीत अनुक्रमे खंड न पाडता उत्तीर्ण असावा. अनुसूचित जाती,जमाती आणि मुली, दिव्यांग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव असतील. तृतीयपंथी उमेदवार देखील या निवड चाचणीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज सादर करताना आधार कार्ड, मुख्याध्यापकांचे पत्र, रहिवासी दाखला, फोटो व सही आवश्यक आहे. जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश परीक्षा शनिवार २९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता होईल. माहिती पत्रक व प्रवेश अर्जासाठी www.navodaya.gov.in/ nvs/en/Home1 तसेच https://cbseitms.nic .in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.