आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:हर घर दस्तक अभियानांतर्गत जुलै; अखेर लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा

नंदुरबार23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच संभाव्य चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याकरिता जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत ‘हर घर दस्तक’अभियानांतर्गत लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला अधिक गती देऊन जुलै अखेरपर्यंत पहिला डोस राहिलेल्या नागरिकांचे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.

बुधवारी झालेल्या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ज्या गावात ५० टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झाले आहे त्याठिकाणी गती देत १०० टक्के लसीकरण होईल. याचे नियोजन करा. त्यासाठी तालुकास्तरावर उद्दिष्ट द्या. लसीकरणासाठी शिल्लक लाभार्थ्यांची माहिती घ्या. शाळा सुरू होत असल्याने १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळेतच लसीकरण करा. शिक्षण विभागाने नियोजन करावे. मोहिमेंतर्गत विशेष शिबिर आयोजनाचे नियाेजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...