आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांस्यपदक:ज्युनिअर क्रीडा स्पर्धा; राष्ट्रीय अँथलेटिक्स स्पर्धेत प्रतीकला कांस्यपदक

नंदुरबार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने २ ते ४ जून दरम्यान २० वी राष्ट्रीय अॅथलेटिक्स ज्युनिअर क्रीडा स्पर्धा नाडियाद (गुजरात) येथे पार पडली. या स्पर्धेत नंदुरबारचा खेळाडू प्रतीक दिलीप पिंगळे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत हातोडा फेक क्रीडा प्रकारात ६३.९२ मीटर हातोडा फेक करत तृतीय येण्याचा मान पटकावला. स्पर्धेत यापूर्वी महाराष्ट्राला कधीही पदक मिळाले नव्हते.

मात्र प्रतीकच्या रुपाने पहिल्यांदाच महाराष्ट्राने कांस्यपदक पटकावले आहे. प्रतीक पिंगळे यास क्रीडा शिक्षक प्रा.डॉ. मयूर ठाकरे, अँथलेटिक्स खेळाडू हेमंत बारी, भूषण चित्ते यांचे मार्गदर्शन लाभले. प्रतीकच्या या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते त्यास गौरवण्यात आले. प्रतीकचे या यशाबद्दल सर्व स्तरातून काैतुक करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...