आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्षयतृतीयेला तळोद्यात भरणाऱ्या कालिका मातेच्या यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आमदार राजेश पाडवी, लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी कालिका मातेला साकडे घालून तळोद्यासह नंदुरबार जिल्ह्यातील जनतेला सुख-समृद्धी व निरामय आरोग्य दे, अशी प्रार्थना केली. तत्पूर्वी पुरोहित हरिश्चंद्र महाराज यांच्या हस्ते कालिका मातेची यथासांग पूजा करण्यात आली.
याप्रसंगी राजेंद्र गावित, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, नगरसेवक रामानंद ठाकरे, भास्कर मराठे, नितीन पाडवी, सुरेश पाडवी, हेमलाल मगरे, योगेश पाडवी, कैलास चोधरी, जालंदर भोई, जगदीश परदेशी, राजू पाडवी, अरविंद पाडवी, नारायण ठाकरे, प्रदीप शेंडे, शिरीष माळी, भैय्या चौधरी, दारासिंग पाडवी, पालिकेचे कार्यालय अधीक्षक राजेंद्र माळी, स्वच्छता निरीक्षक आश्विन परदेशी, मोहन माळी, सुनील मगरे, नारायण चौधरी, जगदीश सागर, किरण गवळी, योगेश गुरव उपस्थित होते. कालिका माता मंदिर परिसरातील युवकांनी महाप्रसादाचे आयोजनही केले होते. यात्रेत गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा, अजय कोळी, अनिल पाडवी, रवी पाडवी, राजू मगरे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.