आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:50 एकरांत कलिंगड, 75 दिवसांत 13 लाख पदरात; शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील उच्च शिक्षित तरुणाचा आधुनिक तंत्राने शेतीत प्रयोग

पाटण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याची आवड असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील उच्च शिक्षित तरुण सागर पवार याने पाच एकरमध्ये कलिंगडाची लागवड केली होती. ७५ दिवसांत कलिंगडाचे उत्पादन आले. त्याने तब्बल १३ लाख ३२ हजार रुपयांची कमाई केली. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी क्षेत्रात, कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी सागर नेहमी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतो.

पाटण येथील सागर प्रवीण पवार याचे बीएस्सी अॅग्रीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तो शेतात विविध प्रयोग राबवून शेती करतो. त्याची वडिलोपार्जित शेती आहे. शेतीत पाण्याची चांगली उपलब्धता आहे. पूर्वी पवार हे कापूस,भाजीपाला, कांदा अशी विविध पिके घेत होते; परंतु नफा आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी पर्यायी पिकांचा शोध सुरू केला. त्यानंतर कलिंगडाची लागवड करण्यास सुरुवात केली. त्याने पाच एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरूण ठिबक सिंचन केले.

त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप या प्रमाणे ५५ हजार रोपांची लागवड केली. ८ ते १० दिवसांच्या अंतराने खतांची मात्रा, योग्य वेळी पाणी आणि रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. त्यामुळे केवळ ७५ दिवसांतच कलिंगड बाजारात विक्रीसाठी आले. त्यानंतर स्थानिक बाजारपेठ निवडण्याऐवजी थेट दिल्लीच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून विदेशातील बाजारपेठेत कलिंगड विक्रीसाठी पाठवले. योग्य नियोजन आणि मार्गदर्शनामुळे सागरने यावर्षी कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले.

बातम्या आणखी आहेत...