आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशोत्सव:खेडदिगर जि.प. मराठी, उर्दू शाळेत पाठ्यपुस्तके वाटप करून प्रवेशोत्सव

खेडदिगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा येथे शाळापूर्व मेळावा क्रमांक २ व प्रवेशाेत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोफत पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक शकील पठाण होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमात मुख्याध्यापक महेंद्र निकुम, विकार शेख, शिक्षक तुकाराम धनगर, वंदना मुळीक, रेमल पावरा आदी कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यासोबत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर याही कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...