आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हर घर दस्तक:‘हर घर दस्तक’; आठवडाभरामध्ये फक्त ; 760 नागरिकांनीच घेतला पहिला डोस

नंदुरबार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरोघरी जावून लसीकरण मोहिमेला सहा दिवस झाले असून सहा दिवसांत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ७६० जणांवर पोहेचली असून दुसऱ्या डोसमध्ये लसिकरणाने आघाडी घेतली आहे. सहा दिवसांत २ हजार ४२ जणांनी दुसरा डोस घेतल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या सरासरी दररोज ३४० च्या आसपास आहे. कोरोनाची संभाव्य लाट पहाता लसिकरणाचा वेग अजून वाढविण्याची गरज आहे. आदिवासी दुर्गम भागात लसिकरण शंभर टक्क्यांवर नेण्याचे आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत असून नंदुरबार जिल्हयात मात्र एकही कोरोनाचा रूग्ण नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र केव्हाही कोरोनाची लाट आली तरी जिल्हा प्रशासन लाटेला थोपवण्यास सज्ज असल्याचा दावा जिल्हाशल्य चिकित्सक डॉ चारूदत्त शिंदे यांनी केला आहे. हर घर दस्तक उपक्रमाव्दारे लसिकरणाला वेग यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. १ जून ते ६ जून पर्यंत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ३०१ एवढी असून याचाच अर्थ दररोज केवळ १०० जणांनाच पहिला डोस दिला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे. मात्र तरीही अपेक्षित उदीष्टये गाठण्यासाठी आरोग्य प्रशासनाला अधिक वेग द्यावा लागणार आहे. १ हजार ९४४ आशावर्कर हर घर दस्तक उपक्रमासाठी नेमल्या असून ग्रामीण भागात ज्यांनी लस घेतलेली नाही किंवा पहिली लस घेतली व दुसरी लस घेतली नाही, अशांना लस देण्यावर भर दिला जात आहे.

नंदुरबारची महिला मुंबईत बाधित नंदुरबारची रहिवासी महिला मुंबई येथे कोरोना बाधीत आढळली असून तिच्यावर तिथेच उपचार सुरू आहेत. नंदुरबार शहरात किंवा जिल्ह्यात नव्याने एकही रूग्ण बाधीत नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

औषधांचा पुरेसा साठा ^पुन्हा कोरोना लाटेच्या संकेत येत असले तरी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. डॉ. गोविंद पंडित चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.नंदुरबार

जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही ^नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रूग्णालय, जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना रुग्णांसाठी सर्व सुविधा सज्ज आहेत. कोरोनाचा सद्या एकही रूग्ण नाही. डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...