आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचे आदेश:23 वर्षांच्या लढ्यानंतर मिळाला जमिनीचा ताबा

नंदुरबार6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बस स्थानकासमोरील वीज महावितरण कंपनीने भाडे तत्त्वावर घेतलेल्या जागेचा तिढा अखेर सुटला असून सर्व्हे क्रमांक २५१/ अ/ २ या मिळकतीच्या जागेचा अखेर उद्याेगपती मदनलाल जैन यांनी ताबा घेतला. पोलिस सुरक्षेत जागेवर ताबा मिळाला असून २३ वर्षांनंतर न्यायालयीन लढ्याला यश मिळाल्याची भावना जैन यांनी व्यक्त केली.

१९३७ पासून वीज महावितरण कंपनीला ही जागा भाड्याने दिली हाेती. जागा ताब्यात मिळावी यासाठी जैन यांना तब्बल २३ वर्षे लढा द्यावा लागला. गेल्या महिन्यात जैन यांनी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात फिर्याद दिल्याने या तिन्ही अधिकाऱ्यांना जामीन घेण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यांची जामिनावर सुटकाही झाली.

न्याय मिळाल्याची भावना
कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश वाय.के. राऊत यांनी यापूर्वी मालकाच्या ताब्यात जमीन देण्याचे आदेश दिले होते. परंतु महावितरण कंपनीचे अधिकारी चालढकलपणा करत होते. १४ जून रोजी जमीन ताब्यात घेण्यास गेलेल्या जैन यांना अधिकाऱ्यांनी रात्री ११ वाजेपर्यंत कार्यालयात कोंडून ठेवले होते. या संदर्भातही त्यांनी लढा दिला. न्यायालयाच्या आदेशाने २२ रोजी त्यांना जमिनीचा ताबा मिळाला.

बातम्या आणखी आहेत...